स्थैर्य, दालवडी दि.२६ : येथील देवानंद राजाराम बनकर हे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद (चउअएठ) मार्फत आचार्य (झह.ऊ) पदवीसाठी घेण्यात आलेल्या उएढ परीक्षेत कृषि किटकशास्ञ विषयातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
भारतीय कृषि अनुसंशोधन परिषद (खउअठ) मार्फत घेण्यात आलेल्या आचार्य (झह.ऊ) पदवीच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून 147 व जइउ प्रवर्गातून 61 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत, गतवर्षी कृषि वैज्ञानिक चयन मंडळातर्फे(अडठइ) घेण्यात आलेल्या छएढ परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत.
राजू मारुडा यांची आरपीआयच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
देवानंद बनकर यांचे पदवीचे इ.डल.(असीळ.) शिक्षण कृष्णा कृषि महाविद्यालय, रेठरे बु॥, ता. कराड येथे झाले असून त्यांनी पदव्युत्तर पदवी च.डल.(असीळ.) चे शिक्षण कृषि महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले आहे. कृषि किटकशास्ञ या विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी मका पिकावरील लष्करी आळीच्या जीवन क्रमावरील आपले संशोधन पूर्ण केले आहे. संशोधन आणि आचार्य पदवीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना त्यांना संशोधन मार्गदर्शक डॉ. विजयकुमार भामरे, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुर्यवंशी व डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
फलटण बाजार समीतीचे माजी चेअरमन बी. के. निंबाळकर यांचे निधन