स्थैर्य, फलटण दि.२७ : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांची महाराष्ट्र डिजिटल मिडीया असोसिएशनच्या (चऊच-) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी, ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव भांबुरे यांची फरांदवाडी ऍग्रो कृषी क्रांतीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आणि गोखळीचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांची नात कु. स्वरा भागवत हिने 12 तास सायकलिंग करुन 143 किमी अंतर पार करण्याचा विक्रम केल्याबद्दल फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने शनिवार दि.28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन, शिंपी गल्ली, फलटण येथे सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.
फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया वगैरे विविध क्षेत्रातील पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन बी. के. भाऊ निंबाळकर यांचे निधन