स्थैर्य, नागठाणे,दि ६: अपशिंगे (मि.) ता.सातारा येथील १४ व्या वित्त आयोगातून केलेल्या बहुद्देशीय सभागृहाचे नूतनीकरणाचे उदघाटन नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा चव्हाण,सहायक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अपशिंगे ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये करण्यात आलेल्या मनरेगा अभिसरणमधून रस्ता काँक्रेटिकरण, गांडूळ खत व्यवस्थापन (खत प्रकल्प), अंगणवाडी कामांची पाहणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी पवार सर, पाणीपुरवठा शाखा अभियंता संदीप पाटील,भागविस्तार अधिकारी प्रकाश धनावडे,ग्रामविकास अधिकारी बिपीन बागल, सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच उमेश निकम,ग्रामविकास अधिकारी बिपीन बागल तसेच सर्व शासकीय अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.