स्थैर्य, फलटण, दि. 12 : के.बी.एक्सपोर्ट्सचे संचालक व गॅलेक्सी क्रेडिट को-ऑप.चे चेअरमन सचिन यादव यांच्या नेतृत्वात कंपनी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. यावेळी सामाजिक व प्रशासकीय कार्य करणा-या कोरोना योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्याने कंपनीची एक हळवी बाजू देखील समाजासमोर आली आहे. कोरोनाच्या संकटात गोर गरीब लोकांना तोंडाची गाठ हाताशी पडणे कठीण झाले होते त्याकाळात हजारो कुटुंबाना के. बी. एक्सपोर्ट्स ने आधार दिला. तसेच अनेक सामाजिक कार्य करणार्या कार्यकर्त्यांना व संस्थांच्या अन्नछत्र व सामाजिक कार्यास मदत केली होती. त्याचवेळी समाजात फलटण तालुक्यात इतर ही अनेक सामाजिक तसेच राजकीय व प्रशासकीय अधिकारी कोरोना योद्धा म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना सहकार्य करीत असतानाच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे देखील महत्वाचे असते. हेच जाणून आज के.बी. एक्सपोर्टस् तर्फे सामाजिक व कोरोना योद्धांचा सुरेख असे सन्मानपत्रक, शाल व बुके देऊन सत्कार केला. तसेच हा सत्कार प्रत्येक कोरोना योध्याच्या घरी जाऊन करण्यात आला हे जास्त सुखद होते. असा घरी येऊन सत्कार झाल्यामुळे कोरोना योद्धांच्या घरी देखील भावुक वातावरण झाल्याचे दिसून आले व त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतलेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
कंपनीतर्फे आज तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप,पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पंचायत समिती गट विकास अधिकारी सौ. अमिता गावडे, तसेच शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप पोमण व नितीन सावंत, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येकाचा सत्कार करीत असताना प्रत्येकाच्या कार्याचे वैयक्तिक पत्र लिहून कंपनीतर्फे अभिनंदन करण्यात आले.
त्यानंतर सर्व राजकीय व सामाजिक कोरोना योध्याना सन्मानपत्रक, शाल तसेच अभिनंदनपर पत्र सुपूर्द करण्यात आले. फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांना त्यांनी वॉर्डमधील नागरिकांना 3 महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट देणेच्या कार्या बद्दल, अनुप शहा यांना गोरगरीब लोकाना किटवाटप तसेच अविरत अन्नछत्र चालवल्याबद्दल, नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, किशोरसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्या नियमित अन्नछत्र व भाजीपाला वाटप च्या कार्याबद्दल, स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे तसेच अन्नछत्रच्या कार्याबद्दल, नगरसेवक अशोक जाधव यांनी अन्नछत्र तसेच दुग्ध वाटप इत्यादी कार्य नियमित केले बद्दल, जाधववाडीचे उपसरपंच तसेच मराठा मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत यांनी नागरिकांना अनेक दिवस खाद्य पदार्थ तसेच भाजीपालाचा पुरवठा केले बद्दल, पत्रकार व नगरसेवक अजय माळावे अन्नछत्र तसेच स्वतः औषध फवारणी केल्याबद्दल, सनी अहिवळे नियमित अन्नछत्र तसेच गरिबांना घरपोच किट दिल्याबद्दल, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे जीवनावश्यक वस्तूंचे नागरिकांना किट वाटप केल्याबद्दल, सौ. ज्योती खरात अन्नछत्रला योगदान केल्याबद्दल, महेंद्र बेडके हॉटेल आर्यमान तर्फे अन्नछत्र व उत्तम नियोजन केल्याबद्दल, अमीर शेख अन्नछत्र तसेच परप्रांतीय मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पोहचवण्यास मदत केल्याबद्दल, अभिजित भोसले हॉटेल ब्रह्म तर्फे अन्नछत्र व उत्तम नियोजन केल्याबद्दल, समीर तांबोळी अन्नछत्र चालवल्याबद्दल डॉ. योगेश साळुंखे, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे शहरात वाटप केल्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल खास पद्धतीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सर्वांनी अश्या पद्धतीने सन्मान केलेबद्दल के. बी. एक्सपोर्टस कंपनीचे संचालक सचिन यादव यांचे आभार मानले व अश्या सत्कारामुळे कार्यास नवी उमेद मिळाल्याचे नमूद केले.