स्थैर्य, फलटण दि.१५ : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटणने शिष्यवृत्ती परीकक्षेतील यशाची परंपरा अखंडीत सुरु ठेवली असून यावर्षी प्रशालेचे 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये श्रृती निलेश कराळे 254 गुण मिळवून जिल्ह्यात 41 वी व शहरी विभागात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक, ऋग्वेद मुरलीधर फडतरे 240 गुण मिळवून जिल्ह्यात 121 वा आला असून या विद्यार्थ्यांची
सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. कु. तेजस्वी दादासो रासकर, 232 गुण मिळवून जिल्ह्यात 182 व्या क्रमांकावर आले आहेत.
यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुथराजे नाईक निंबाळकर, सोसायटी सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्कूल कमिटी चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व सर्व कमिटी सदस्य, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. प्रभावती कोळेकर, फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी राजेंद्र गंबरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. काकडे, मुख्याध्यापिका सौ. जाधव, सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.