
स्थैर्य, दि.२३: भारतीय नौदलाने युद्धाची तयारी दाखवण्यासाठी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, युद्ध नौकेतून सोडलेल्या अँटी शिप मिसाइलने एका जहाजावर अचुक वार केला. ही ड्रील अरबी समुद्रात करण्यात आली.
नौदलाच्या आयएनएस प्रबल या युद्ध नौकेतून अँटी शिप मिसाइल डागण्यात आले. आयएनएस प्रबल नौसेनेच्या युद्ध अभ्यासातील जहाज आहे. या अभ्यासात एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यसोबत अनेक युद्धनौका, हेलिकॉप्टर आणि विमानं भाग घेत आहेत. नौसेनेच्या प्रवक्त्याने ट्वीट करुन सांगितले की, आयएनएस प्रबलमधून लॉन्च झालेल्या मिसाइलने आपल्या मॅक्सिमम रेंजने एका जुन्या जहाजाली टार्गेट केले.