फलटणमध्ये नाकाबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त; ६७ वाहनांवर कारवाई : पोलीस निरीक्षक भारत किंद्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०४ : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील असणाऱ्या फलटण शहर, कोळकी व जाधववाडी येथे फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी प्रतिबंधक क्षेत्र घोषित केलेले आहे. तरीही फलटण शहरात व उपनगरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणूच फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे. या नाकाबंदीमध्ये विनाकारण जर बाहेर फिरत असतील तर त्यांची वाहने हि आठ दिवसांसाठी जप्त करण्यात येत आहेत. आज दि. ०४ मी २०२१ रोजी फलटण शहरामध्ये ६७ वाहने हि आठ दिवसांसाठी जप्त करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

फलटण शहर व उपनगरांमध्ये जो कोणी विनाकारण बाहेर फिरणार आहे. त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने हि तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात येणार आहे. सदर कारवाई करता फलटण शहर पोलीस स्टेशनमधील ४ अधिकारी, ३० पोलीस अंमलदार,१५ होमगार्ड नेमण्यात आलेले आहेत. तरी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण कोणीही बाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.


Back to top button
Don`t copy text!