स्थैर्य, मुंबई, दि.२५: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशातील अनेक राज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाड होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी असणार आहे. तसेच कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असणार आहे. ही टेस्ट जवळपास दिवस आधीच करण्यात आलेली असावी असेही यामध्ये नमूद केले आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी केली जाणार आहे.
यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रत राज्यात आता परराज्यातून येणाऱ्यांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश मिळणार आहे. यासाठीच आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्टवर तयारी सुरू झाली आहे. यासोबतच देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.
मराठा समाजासाठी मोठी बातमी, शैक्षणिक प्रवेशाबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय