सातारा पालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन (पहा व्हीडिओ)


लाचखोर अधिकाऱ्यांचा निषेध

स्थैर्य, सातारा, दि. 12 : सातारा नगर पालीकेतील आरोग्य विभागातील अधीकारी आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगूडे, प्रवीण यादव, गणेश टोपे व उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. लाचलूचपत प्रतीबंधक पथकाने सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केल्याने हा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने संपूर्ण आरोग्य विभागाची बदनामी झाली आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सर्व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने पालीकेतील कर्मचारी यांनी काळ्या फीती लाऊन कामकरून आपला निषेध नोंदवला.

यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ साताराचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले, सातारा नगरपालीकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सातारा शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानामध्ये नामांकन सूद्धा मिळवून दिले आहे. सद्याच्या कोरोना संकटामध्ये सूद्धा  कोणत्याही संरक्षण साधनांचा विचार न करता काम करत आहेत.  सातारा नगरपालीकेस कसलाही कमीपणा येणार नाही व शहरातील नागरीकांना आरोग्याची समस्या जाणवनार नाही, यासाठी झटत आहेत. या कर्मचाऱ्यांना साथ देऊन काम करण्याची गरज असताना अधिकारी मात्र भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त आहेत. हे सातारा शहराला आणी नगरपालीकेला  शोभणारे नाही. त्यामुळे या भ्रष्ट प्रवृत्तीचा आम्ही संघटीत रीत्या निषेध करत असल्याचे यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ साताराचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले.

भ्रष्टाचार करण्यासाठी अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो. तसेच घंटागाडीवाल्यांना काहीही कारणे सांगून दंड आकारणे, अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करावी,  घंटागाडी व कामगार वर्गातील ठेकेदारी ही भ्रष्टाचाराची ठीकाणे रद्द करून रोजंदारीवर कामगार भर्ती करावी, अशी मागणीही खंडाईत यांनी यावेळी केली.

यापूढे जर हेच अधिकारी पुन्हा आरोग्य विभागातच रूजू झाले तर आम्ही त्यांना कोणतेही सहकार्य करनार नाही. वेळ पडल्यास तीव्र  कामबंद आंदोलन करू, असा इशाराही खंडाईत यांनी दिला आहे.

यावेळी सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याचे संघटनेचे सचिव सागर गाडे यांनी माहीती दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!