स्थैर्य, फलटण, दि.२१: खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंजवडी गावासह फलटण तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगीतले.
मुंजवडी येथे भारतीय जनता पक्षाच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन गावाच्या विकासासाठी काम करावे. आपापसातील मतभेद विसरून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली हातात हात घालून कार्यकर्त्यांनी लढाव्यात. त्यासाठी लागणारी ताकद पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी उभी करू, असेही जयकुमार शिंदे यांनी यावेळी सांगीतले.
भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे म्हणाले, या भागातील जनतेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.कधीही आपण बोलवाल त्यावेळेला आपल्या हाकेला आम्ही उभे राहू.
यावेळी गावातील प्रमुख पदाधिकार्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली व येथुन पुढे आम्ही एकत्रित बसुन निर्णय घेऊ असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी भटक्या विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे, जनार्दन ठणके पाटील, माजी चेअरमन रामभाऊ येडे, माजि सरपंच बाळासाहेब निंबाळकर, विजय ठणके, सोसायटी संचालक शंकराव पवार, माजी सरपंच पोपटराव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सागर ठणके, आप्पासाहेब पवार, विकास रणदिवे, बाळासाहेब घाडगे, माणिकराव साळुंखे, नारायण घाडगे, लालासो साळुंखे, माऊली ठणके, युवा नेते निलेश पवार, राजेंद्र पवार, शरद पवार, पिंटू ठणके, दादासो ठणके, प्रभाकर निखळे, सुनील निखळे, सोमनाथ ठणके, शिवाजी घाडगे, अमोल घाडगे, बापूराव भंडलकर, गंगाराम रणदिवे, प्रदीप जाधव, पांडुरंग ठणके, विशाल ठणके, गंगाराम रणदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार शरद झेंडे यांनी मानले.