स्थैर्य, मुंबई, दि.१३: शिवसेना पदाधिकाºयांकडून माजी नौदल अधिकाºयाला मारहाण करुनही त्यांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपतर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
यावेळी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समाविष्ट करण्याचे आश्वासन पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिले. दरेकर आणि नांगरे पाटील यांची चर्चा सुरु असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली.
निवृत्त नौदल अधिकाºयाला ज्या पद्धतीने मारहाण झाली. शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले. त्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले, पण लगेच सोडून दिले. पोलिसांनी जी कलमे लावणे अपेक्षित होते, ती लावली नाही. ती लावावी यासाठी आम्ही आंदोलन केले. पोलिसांनी कलमे वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जर ही कलमे लावली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु, असे दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही
नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात सुरक्षित वाटत नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या मुलाने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप आहे. मदन शर्मा हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. या मारहाण प्रकरणावरुन भाजपाने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे.