भाजपला २०२४ मध्ये तब्बल चारशे जागा मिळतील – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टोक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि एकूणच राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यच काय तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे, देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा हवा तो मोदी यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल 400 जागा मिळवेल असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत यामुळे केंद्र स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपी याच्या मध्ये वाढ होत आहे. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जागतिक पातळीवर आकर्षण आहे. त्यांच्या कामाची पद्धत ही अत्यंत वेगळी असून त्यामुळेच भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेच्या जवळ जात आहे. एक काळ असा होता की, देशाच्या लोकांना काँग्रेस पक्षाचे विलक्षण आकर्षण होते मात्र आजच्या गांधी घराण्यामुळे ते राहिलेले नाही महाराष्ट्रातील महाविकासआघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

कोल्हापूर पोटनिवडणुकीत काय निकाल लागेल या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले म्हणाले कोल्हापूर विधानसभा निवडणूक जी आहे ती जागा आम्ही शंभर टक्के जिंकू पाचपैकी चार राज्यात बीजेपीला यश मिळाले. त्यामुळे ही जागा सुद्धा आम्ही निश्चितच जिंकणार यात शंका नाही 2024 च्या निवडणुका आणि कोणत्याही पोटनिवडणुका यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष असल्याने आणि संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने कोण सत्ता मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही याचे परिणाम तुम्हाला 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसतील यावेळी भाजपला 400 हून अधिक जागा मिळू शकतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात एक लाख 434 कोटीचे बजेट केवळ केंद्र स्तरावरील रस्त्यांसाठी आखण्यात आले आहे. मोदी शासनाने साठ टक्के निधी देशासाठी आणि 40 टक्के निधी राज्यांसाठी असा वाटप केला आहे. 45 कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून 32 कोटी लोकांना मुद्रा लोन मिळाले आहे त्यामुळे विकासकामांचा सुधा झपाटा जोरदार असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला काळजी करण्याचे कारण नाही.
भारतीय जनता पक्ष आणि मनसेच्या राजकीय जवळकी बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही त्यामुळे त्यांचा वादळ हे भाषणांचा आहे मतांचं नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला निवडणुकीनंतर इंधन दरवाढ निश्चित कमी होईल मात्र राज्याने काही टक्के दरवाढ कमी करावी केंद्राला दोषी धरू नये अशी अपेक्षा त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले पवार साहेबां सारखा सक्षम नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात प्रतिमा आहे तरीसुद्धा त्यांच्या घरावर हल्ले होत असेल तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा टोला त्यांनी लगावला या हल्ल्याबाबत भाजपकडे सातत्याने बोट दाखवले जाते पण मात्र तसे नाही या प्रकरणाची चौकशी करावी ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आठवले म्हणाले एसटी कर्मचारी आणि त्यांचे पगार तसेच महामंडळाचे विलीनीकरण हे मुद्दे राज्य शासनाने तात्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांची सोय करावी असे मत त्यांनी कळकळीने मांडले.

कटगुण येथे महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभी करण्यासंदर्भात आपण निश्चित प्रयत्न करू तसेच साताऱ्यातील दोन राज्यांमधील संघर्षाबाबत बोलताना त्यांच्यातील वाट मिटणे पक्षाच्या वाढीसाठी गरजेचे आहे अशी मते त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.


Back to top button
Don`t copy text!