दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । जयपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजस्थानातीलकाँग्रेसवरील राजकीय संकटावरून मुंख्यमंत्री गेहलोत यांना कोपरखळी मारली. ‘मी गहलोत यांचे विशेष आभार मानतो. ते सध्या अनेक राजकीय संकटांचा सामना करत आहेत. मात्र असे असले तरी, त्यांनी विकास कामासाठी वेळ काढला आणि रेल्वेच्या या कार्यक्रमात सहभागी झाले. मी त्यांचे स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पंतप्रधा मोदी यांच्या या वक्तव्याकडे मोठी राजकीय खेळी म्हणणूनही पाहिले जात आहे.
गेहलोत सरकार आणि काँग्रेस पायलट प्रकरण पक्षांतर्गत असल्याचे म्हणत त्याकडे दूर्लक्ष करत आहे. मात्र, याच वेळी पीएम मोदी यांनी हे राजस्थान काँग्रेसमधील ‘संकट’ असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजस्थानातील राजकीय अस्थिरता आणखी वाढू शकते. राजकीय विश्लेषक मोदी यांच्या या वक्तव्याकडे भाजपची जनते समोरील कांग्रेसविरोधातील मोठी चाल म्हणून पाहत आहेत. यामुळेच सीएम गेहलोत यांच्या ओएसडीने पीएम मोदी यांच्या या वक्तव्यावर आणि रेल्वे मंत्र्यांच्या ‘सबका विश्वास!’ या ट्विटवर काही वेळातच पलटवार केला आहे.
आपला विश्वास हीच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद –
मोदी म्हणाले, ‘मी गेहलोत यांना सांगू इच्छितो की, आपल्या दोन्ही हातात ‘लड्डू’ आहेत. आपले रेल्वे मंत्रीही राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचेच आहेत. दुसरे म्हणजे, जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच व्हायला हवे होते ते आजपर्यंत झाले नाही. पण आपला माझ्यावर एवढा विश्वास आहे, एवढा विश्वास आहे की, आपण ती कामेही माझ्यासमोर ठेवली आहेत. आपला हा विश्वासच माझ्या मित्रत्वाची खरी ताकद आहे आणि आपण एक मित्र म्हणून जो विश्वास दाखवता, यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे.’