दैनिक स्थैर्य | दि. 25 डिसेंबर 2023 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी‘महाविजय 2024’लोकसभा प्रवासात मंगळवार, दि. 26 डिसेंबर 2023 रोजी माढा लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील; अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
• फलटण येथील कार्यक्रम
सकाळी 10.30 वा. फलटण (जि.सातारा) येथील महाराजा मंगल कार्यालयात माण व फलटण या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी ११.३० . वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बाजारपेठ येथे संपर्क से समर्थन अभियानात सहभागी होतील. यानंतर ते जनतेशी संवाद साधणार आहेत.
• अकलूज येथील कार्यक्रम
सायं. 04.30 वा. अकलूज (जि. सोलापूर) येथील कृष्णप्रिया हॉल येथे करमाळा, माढा, सांगोला व माळशिरस या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यासोबतच ते काही प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेह भेटी घेणार आहेत व भाजपा संघटनात्मक बैठकीत सहभागी होतील.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, धैर्यशील मोहिते पाटील, लोकसभा संयोजक व सरचिटणीस जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, सचिन कांबळे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, सचिन अहिवळे, अशोकराव जाधव, तुकाराम शिंदे, विश्वासराव भोसले, बाळासाहेब कदम, महादेव अलगुडे, महादेव पोकळे, सुशांत निंबाळकर, अनुप शहा, रियाज इनामदार, सागर शहा, सागर लंभाते, प्रसाद पाटील, राजेंद्र निंबाळकर, वसीम इनामदार, बबलु मोमीन, फिरोज आतार, महेबुब मेटकरी, संतोष सावंत यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.