भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 06 : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मातोश्री व भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

‘स्नेह आणि ममत्वाने मला नेहमीच वाट दाखवणाऱ्या माझ्या आईचे आज सकाळी निधन झाले आहे. आईने आयुष्यभर स्वत:ला सेवेसाठी वाहून घेतलं आणि आम्हालाही त्यासाठी नेहमी प्रेरणा दिली’ अशा भावना गोयल यांनी व्यक्त केल्या.

चंद्रकांता गोयल या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक होत्या. भाजपमध्ये अत्यंत निष्ठेने त्यांनी काम केले. मुंबईतील माटुंगा विधानसभा मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव होता. या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या तीनवेळा निवडून आल्या होत्या. भाजपच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. गोयल कुटुंब जनसंघाच्या काळापासून भाजपशी जोडलं गेलेलं आहे. चंद्रकांता गोयल यांचे पती वेद प्रकाश गोयल हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी शिपिंग मंत्रालयाची धुरा सांभाळली होती.

चंद्रकांता गोयल यांच्या निधनाने भाजपने एक धडाडीचं महिला नेतृत्व गमावल्याची भावना ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. भाजप नेते विनोद तावडे, खासदार पूनम महाजन यांनीही चंद्रकांता गोय यांना श्रद्धांजली वाहिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!