माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांचा वाढदिवस मलठण येथील निवासस्थानी येथे विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. पांडुरंग गुंजवटे यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायच समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सातारा जिल्ह्यामधील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांना शुभेच्छा दिल्या.

फलटण शहरामधील मलठण येथील पांडुरंग गुंजवटे यांच्या निवासस्थानी ते शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी मलटण परिसरातील बहुतांश नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवत पांडुरंग गुंजवटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!