
दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, फलटण एज्यूकेशन सोसायटीचे, कृषी महाविद्यालय फलटण अंतर्गत ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून मठाचीवाडी येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी प्रतिमापूजन आणि पुष्पार्पण मठाचीवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. सुखदेव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. ते एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकतावादी होते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. तसेच लालबहादूर शास्त्री भारताचे द्वितीय पंतप्रधान होते. जरी लालबहादूर शास्त्री यांचे स्थान द्वितीय होते, तरी त्यांचे शासन कार्य अद्वितीय होते. अशा या महान कर्तृत्ववान आणि शांत स्वभावाच्या नेत्याला १९६६ मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच सौ. जयश्रीताई भोसले, उपसरपंच श्री. काकासो कदम, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दीपक अण्णा जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल भोसले, क्लार्क श्री. पोपट शेलार, शिपाई श्री. मच्छिंद्र भोसले व मान्यवर उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा.स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, समृद्धी उल्हारे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ व समृद्धी कुंजीर यांच्याद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात आला.