वाठार निंबाळकर येथे कारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२४ | फलटण |
वाठार निंबाळकर, ता. फलटण गावचे हद्दीत वाठार फाटा ते पुसेगाव जाणार्‍या रस्त्यावर दि. १ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कार (नं. एमएच १४ एचडब्ल्यू ६३२१) चालकाने समोर चालणार्‍या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना समोरून येणार्‍या दुचाकीस्वारास (क्र. एमएच ११ सीएम ६२८८) धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार प्रवीण बाळासो जाधव (वय ३६ वर्षे, रा. ढवळ, ता. फलटण, जि. सातारा) हा गंभीर जखमी होऊन ठार झाला. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.या कारचालकाविरोधात वाहन हयगयीने चालवून प्रवीण जाधव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!