राजुरीजवळ फलटण-पंढरपूर रस्त्यावर दुचाकीचा अपघात; चालक ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ एप्रिल २०२३ | फलटण |
राजुरी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते पंढरपूर जाणार्‍या रस्त्यावर साधूबुवा मंगल कार्यालयाजवळ सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी सहापदरीकरणाचे काम सुरू असताना मोटारसायकल दगडावर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला तर पाठीमागे बसलेला एकजण किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

या अपघाताची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, राजुरी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत फलटण ते पंढरपूर जाणार्‍या रस्त्यावर साधूबुवा मंगल कार्यालयाजवळ सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी सहापदरीकरणाचे काम सुरू असताना दुचाकीचालक कुमार शहाजी वगरे (वय २२, रा. बोरगाव, ता. माळशिरस, जि.सोलापूर) हा मोटारसायकल (क्र. एम.एच. ४५ जी. ७९१६) वरून पंढरपूरकडे निघाला असताना पर्यायी वळणाच्या रस्त्यावर दुचाकी न वळवता तसाच सरळ जाऊन दगडावर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक कुमार वगरे हा ठार झाला, तर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला सचिन संजय रेडे (वय १९, वर्षे, रा. बोरगाव, ता. माळशिरस, जि.सोलापूर) हा किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि भोसले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!