
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सातारा जिल्हा माजी उपप्रमुख विराज खराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी काळामध्ये विराज खराडे यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विराज खराडे व विजय मायने यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
विराज खराडे व विजय मायने हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी असताना पक्ष वाढीसाठी पक्षासाठी अनेक आंदोलने केली. पक्ष वाढीसाठी तळागाळापर्यंत काम केले. अनेक आंदोलनाचे गुन्हे त्यांच्यावर चालू आहेत त्यानी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बाळासाहेबांची शिवसेनेत त्यानी काम करण्याचे ठरवले असल्याने त्यांचा हा प्रवेश झाल्याचे त्यांनी सांगितले.