दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
फलटण येथील गोविंद दूध डेअरी समोरून दि. १५ जून रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटारसायकल (क्र चक ११ उङ ०२६९) सुमारे २० हजार रुपये किमतीची चोरट्यांनी पळवून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दीपक बाबुराव चव्हाण (रा. शारदानगर, ता. बारामती) यांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करीत आहेत.