वारकरी भवन इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्था (वारकरी संघटना) यांच्या प्रयत्नाने सुमारे २० लाख रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन इमारतीचे भूमिपूजन भाजप वरिष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात आले.

ना. मिश्रा यांच्या समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, डॉ. प्रसाद जोशी, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, डी. एम. घनवट, जे. एल. काटकर, एस. एम. घाडगे, बजरंग गावडे, अमोल सस्ते उपस्थित होते.

भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षस्थानी, सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्थेचे (वारकरी संघटना) संस्थापक ह.भ.प. गणपतराव बाबुराव तथा बबनराव निकम होते.

भूमिपूजन करताना ना. अजयकुमार मिश्रा व अन्य मान्यवर.

सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर समोर, जुन्या जकात नाक्याच्या जागेवर, बाणगंगा नदी काठी, मलठण येथे सदर वारकरी भवन ईमारत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात येत असून सध्याच्या वारकरी भवन ईमारतीला जोडूनच ही नवी वास्तू उभारण्यात येत असून दोन्ही ईमारतीचा दुसरा मजला भविष्यात एकत्र करुन घेता येईल अशा पद्धतीने या ईमारतीची रचना व उभारणी करण्यात येत असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी ह.भ.प. केशव महाराज जाधव यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!