पालखी सोहळ्यातील भीमराव सास्ते बरड येथून बेपत्ता


दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
बरड (तालुका फलटण) गावच्या हद्दीतून दिंडीमधून पायी प्रवास करताना दि. १० जुलै २०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून भीमराव नामदेव सास्ते (वय ५५, राहणार पिंपळगाव, रेणुकाई, ता. भोकरदन, जि. जालना) हे बेपत्ता झाल्याची फिर्याद रामेश्वर भीमराव सास्ते यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

भीमराव सास्ते यांची उंची ५.८ इंच, रंग सावळा, अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट, पांढर्‍या रंगाची पॅन्ट, गळ्यात पांढर्‍या रंगाचा रुमाल, केस काळे-पांढरे, अनवाणी, मराठी भाषा बोलतात.

सास्ते हे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात जामवंत महाराज यांची दिंडीतून आळंदी येथून पंढरपूरला जाण्यास निघाले होते.

अधिक तपास स.फो. मठपती करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!