भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुकाध्यक्षपदी भीमराव लोंढे; तर सरचिटणीसपदी केशव ठोंबरे यांची निवड


स्थैर्य, फलटण, दि. ३१ मार्च : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने फलटण तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी आयु. भीमराव लोंढे, सरचिटणीसपदी आयु. केशव ठोंबरे, तर कोषाध्यक्षपदी आयु. राजकुमार रणवरे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी राज्याचे संघटक व समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना समता, बंधुता व करुणा या धम्ममूल्यांच्या आधारे काम करून सर्व गावातील घटकांना कार्यकारिणीत सामावून घेण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे, माजी अध्यक्ष आयु. शिवाजी सावंत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. नानासाहेब मोहिते यांनीही मार्गदर्शन करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नूतन अध्यक्ष भीमराव लोंढे व कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे यांनी सर्वांना सोबत घेऊन धम्माचा शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यकारिणीत इतर विविध पदांवर दादासो कांबळे, अरविंद निकाळजे, दीपक सपकाळ, संपत माने, प्रदीप जगताप, सचिन मोहिते, धीरज मोरे, विजय लोंढे, सागर काकडे, सुनील कांबळे, अनिकेत कांबळे आणि सचिन रोकडे यांची निवड करण्यात आली आहे.

सोमीनाथ घोरपडे यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली, तर अरुण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई काकडे, वंचितच्या महिला जिल्हा प्रमुख चित्राताई गायकवाड यांच्यासह अनेक धम्मबंधू-भगिनी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!