भीमराव गौतम कांबळे यांना ‘हवालदार मेजर’पदी पदोन्नती


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
वेळोशी (ता. फलटण) गावचे सुपुत्र भीमराव कांबळे यांना ‘हवालदार मेजर’पदी पदोन्नती मिळाली आहे. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून २००५ साली भरती झाले होते.

मूळचे फलटण तालुक्यातील वेळोशी गावचे असणारे व सध्या चौधरवाडी रेल्वे फाटा येथे स्थायिक झालेले भीमराव गौतम यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून २००५ मध्ये नेमणूक झाली. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये झारखंड, त्रिपुरा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गडचिरोली, छत्तीसागड, जम्मू आणि काश्मीर येथे अतुल्य योगदान दिले आहे. जम्मू आणि काश्मीर येथे नक्षलवादी आतंकवादी व अलगावदी विरुद्ध प्रत्यक्ष त्यांचा खात्मा करणार्‍या ऑपरेशनमध्ये त्यांनी लढा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जम्मू आणि काश्मीरपासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्भवलेल्या अपत्कालीन स्थितीमध्ये सुद्धा देशाच्या नक्षलवादी आपले योगदान दिले आहे.त्यांच्या या कठोर सेवेनंतर हवालदार मेजर म्हणून ९ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दुसर्‍या बटालियनचे कमांडेट रविकांत बेहरा यांच्या हस्ते पदोन्नती देण्यात आली.

सध्या ते छत्तीसगडच्या सुखमा येथे नक्षलवादी विरोधी अभियानामध्ये कार्यरत राहून देशसेवा बजावत आहेत. त्यांच्या या पदोन्नतीबदल त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!