भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त फलटणमधून महिला रवाना : माजी नगरसेवक सचिन अहिवळे


दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । फलटण । २०५ व्या शौर्य दिनानिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी भीमा कोरेगाव येथे गर्दी केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली. फलटण येथील भीम अनुयायींनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक सचिन अहिवळे व आरपीआयचे विजय येवले यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे गेले होते.

फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भीमा कोरेगावकडे महिला मार्गस्थ झाल्या. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, विजय येवले, दत्ता सर, बी. टी. जगताप, तेजस काकडे, लक्ष्मण अहिवळे, मारुती मोहिते व मंगळवार पेठेतील महिला व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!