
स्थैर्य, तारळे, दि. ३१ : भाद्रपद महिन्यात गणेशोत्वाबरोबरच नवचैतन्य निर्माण करणारा पारंपरिक भीमसेन यात्रा उत्सव यावर्षी खंडित होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने भाद्रपद पौर्णिमेला रात्री भंडारा, महाप्रसाद, जाधव आळीचे तालीम संघाचे मानाचे उदबत्त्यांचे झाड, मर्दानी खेळ, शोभेचे दारूकाम, आतषबाजी आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
प्रतिवर्षी पारंपरिक 7 फुटी भीमाची सजवलेली मूर्ती असायची. तिचा आकार यावर्षी साडेचार फूट करण्यात आला आहे. हरिनाम, भजनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. बुधवार, दि. 2 व गुरुवार, दि. 3 रोजी भाद्रपद वद्य प्रतिपदा असा हा उत्सव रद्द केला आहे. गुरुवार, दि. 3 रोजी नियमांचे पालन करून भीम-कुंती उत्सव विसर्जनाने सांगता होणार आहे. भाविकांनी गर्दी करू नये. सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.