दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । भारतीय संस्कृतीचा सुंदर दागिना म्हणजे श्यामची आई म्हणजेच माता यशोदा उर्फ बयो आपल्या मुलाला लहानपणापासूनच योग्य वळण लागावे, नैतिक मूल्यांचे रुजवण व्हावी यासाठी प्रतिकूल परिस्थितीत या भारतमातेने देशाला एक त्यागी साहित्यिक, स्वातंत्रसैनिक, भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारा भारतपूत्र शाम म्हणजेच साने गुरुजी यांच्या रूपाने भारत देशाला दिला. क्षणा- क्षणाणाला भूतदया करावी, कुणाचाही तिरस्कार करू नये, मनःपूर्वक दया दाखवावी. यांची शिकवण देणारी या माऊलीने दिली. माता यशोदेने खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती, व हिंदू धर्माचाची शिकवण आपल्या लेकराला दिली. शाम उत्तम व जबाबदार नागरिक तयार करण्याचे यशस्वी काम माता यशोदेने केले आहे.
यावरच 1953 चाली प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपटाची निर्मिती केली आणि विशेष म्हणजे तत्कालिन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने मराठी भाषेतल्या या चित्रपटासाठी म्हणजेच ‘श्यामची आई’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
‘एक आई हजारो शिक्षकांच्या बरोबरीने आदर्शवत काम करू शकते.’ हे सुवचन माता यशोदेच्या या बाबतीत तंतोतंत लागू होते. भारतीय संस्कृतीचं खरं लेणं लाभलेलं एक सुंदर प्रतीक म्हणजे माता यशोदा आपला पूत्र मानसिक, भावनिक, नैतिक दृष्ट्या सुजान तयार व्हावा, उत्तम नागरिक तयार व्हावा यासाठी या मातेने क्षणाक्षणाला मूल्ये व जीवनकौशल्यांची जाणीव करून दिली. नैतिक मूल्यांचे संस्कार यांचे बीज पेरले. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आनंदी जीवन कसे राहता येते या वस्तुपाठ या मातेने दिला.
शाम स्नान करून झाल्यावर मातीवर पाय ठेवत नसे तो आईला पदर खाली ठेवायला लावायचा आणि त्याच्यावर पाय ठेवत घरात यायचा यावेळी या मातेने दिलेलं उत्तर हे संपूर्ण जगाला उद्बोधक व चिंतनशील आहे. आजच्या समाजात मातांनी आपल्या पुत्रावर असे संस्कार केले तर निश्चितपणे भारत बलसागर झाल्याशिवाय राहणार नाही. काय होते उत्तर, ‘’अरे श्याम ! पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हं.’’
दुसरा प्रसंग माता यशोदा परमेश्वराची प्रार्थना करत असताना पूजा करत असताना रोज काही फुले देवासमोर ठेवत असत. शाम आईला फुले आणून देत. पण बऱ्याच वेळेला शामचे मित्र अगोदरच फुले तोडत. त्यामुळे शामला फुले मिळत नसत. आपल्याला फुले मिळत नाही म्हणून जरा लवकरच बागेत जातात व न उमललेल्या कळ्या सुद्धा खोडून आणतात. आणि आईला देतात. त्यावर आई म्हणते, “बाळ शाम उमलण्याअगोदर कळ्या खुडणे म्हणजे एक महापापच त्या कळ्यांना फुलू दे मग देवाला वहा.”
आपल्या पुत्राला क्षणोक्षणी मूल्यांची, कर्तव्यांची जाणीव करून देणारी माता खऱ्या अर्थाने आदर्शवत भारतमाता वाटते. हा शाश्वत विचार व चिरंजीवी विचार या मातेला कितीतरी अगोदर समजला व तो पुढेही दिला आजच्या मातांना यशोदेचे विचार आपल्या मुलांचे समुपदेशन हे विचार करायला लावणारे वाटते. आणि हेच विचार शाश्वत आहे यात शंका नाही.
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाम काही काळ औंध संस्थानांमध्ये शिक्षण घेत होते त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुण्यात घेतले. संस्कृत मराठी विषय घेऊन ते पदवीधर झाले. एम.ए. तत्त्वज्ञान विषय घेतला. शिक्षण चालू असताना अनेक चरित्रे वाचली. वाचन संस्कृती जपली आणि ग्रंथाशी मैत्री केली. अनेक भाषणे ऐकली. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला आले पण हे करीत असताना अनेक आपदा ह्या होत्याच. शालेय शिक्षणाच्या वेळेस चिंतन-मनन वाचन केले. लेखनाची सवय झाली. शालेय शिक्षण पूर्वी झाल्यावर ते शिक्षक झाले मुलांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे त्यांना शिकवावे आणि जीवनात यश अपयश आले तरी खचून न जाता आलेल्या प्रसंगांना धैर्याने सामोरे कसे जावे ही आपल्या आई व वडिलांनी दिलेली शिकवण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुढे दिली.
1924 नंतर खऱ्या अर्थाने मनापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे भाग्य साने गुरुजींनी लाभले. उत्तम अध्यापन, भाषा, तत्त्वज्ञान शिकविताना सरांचा हातखंडा होता. करून रस त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष साकार होई. आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. शिक्षक संस्कृती, शालेय संस्कृती मधील प्रत्येक गोष्ट त्यांच्यात येत होती. शाळेव्यतिरिक्त त्यांचा वेळ वाचन लेखनात खर्च होई. प्रत्येक काम आवडीने पूर्ण करून देत. आपले विद्यार्थी आपले राष्ट्र सुखी आणि समृद्ध बनविण्याचे स्वप्न डोळ्यासमोर असे. थोड्याच दिवसांत परिसरातील सर्व विद्यार्थी पालक यांना गुरुजी हवे-हवेसे वाटू लागले. साने गुरुजी वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांमधील सर्व उदासीनता, निष्क्रियता दूर होई. गुरुजीना पाहून सर्वांचे चेहरे फुलू लागत. मधाच्या पोळ्या भोवती जसा मधमाशा गर्दी करतात ना अगदी त्याप्रमाणे स्वच्छता अभिमान ही आईची शिकवण सानेगुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना करून देत. हायस्कूलमध्ये सानेगुरुजी यांच्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लागत. शेवटी प्रवेश बंद करावे लागत असे. मित्रांनो साने गुरूजींना मातृहृदयी शिक्षक म्हणतात कारण ते तसे होते. मात्र हाच शिक्षकाचा खरा धर्म असं म्हणणाऱ्या गुरुजींनी तो धर्म आपल्या वाणी, लेखणी व करणीने अधोरेखित केला. पण प्रश्न हा मातृधर्म गुरुजींकडे कसा आला व तो त्यांनी कसा वाढवला तर आम्हाला लहानपणी इतर मुलांपेक्षा वेगळ्या होतात तल्लख बुद्धी उत्कृष्ट भावना तीव्र अवकात त्यांच्या ठायी होते. यामधून एक प्रकारची प्रगल्भता ही श्यामच्या ठाई अगदी लहानपणी उत्पन्न झाली. तितकीच दुसऱ्या बाजूला सर्व हवे दावे यांनी ग्रस्त शूद्र अशीही स्वभाववैशिष्ट्ये उत्पन्न झाली. पण या सर्वांमधून गुरुजी बाहेर येत घडले. ते आद्य विद्यामंदिरातील पहिल्या गुरुजींकडून म्हणजे आईकडून. आपल्या आईला जे सोसावे लागले ते गुरुजींनी जवळून अनुभवले जेवढे सोसावे लागते तेवढी आईची सात्विकता, व प्रसंगी आणखीच पक्की बनतेय हे समोर पाहिले .
समाजात वावरत असताना अनेकांनी त्यांची निंदा केली, उपासना केली. पण साने गुरुजी यांनी कधी प्रत्युत्तर दिले नाही’ संकट येणार पण आपण त्याला तोंड द्यावे. मनाचा तोल कधी त्यांनी सोडला. ही आपली कर्तव्यं आपली शिकवण यालाच त्यांनी आपले साधन हमारी भारतीय संस्कृती यामधून त्यांनी आपली पुतणी सुधाला पत्र लिहिली. आपली पुतणी सुधाला पत्र लिहिणे. त्यातून भारतीय संस्कृतीमध्ये उदात्त तत्वे जगासमोर आणले गेले. निसर्गातून जीवनातील विविध अंगांचे दर्शन मुलांना त्यांनी या पत्रातून लिहिले. त्या पुस्तकाचे नाव सुधाला लिहिलेली पत्रे आर्थिक श्रीमंतीपेक्षा वैचारिक श्रीमंती सर्वश्रेष्ठ आहे. हे त्यांनी वारंवार सांगितले. त्यांच्या अंतकरणात सागराची विशालता, फुलांची कोमलता, चंद्राची शितलता आणि लेखणीत सूर्याची तेजस्विता होती. क्रांती हे परिवर्तन म्हणून त्यांच्या लेखनाकडे आजही बघितली जाते.
सभोवतालचा सारा परिसर सुखी नी संपन्न प्रेममय बनवा ही माझी आंतरिक तळमळ होती. त्यांची धडपड होती. कर्माच्या बाबतीत सानेगुरुजी असे म्हणतात. कर्म उत्कृष्ट राहावे आणि कर्माचा कंटाळा वाटू नये म्हणून कर्मावर आवड असावी. ज्यांच्याविषयी तुम्ही कर्म करणार आहात. त्यांच्या विषयी सुद्धा अपार प्रेम हवे. मानवी जीवनास आवश्यक असलेल्या प्रेम, दया, कष्ट, सेवा, त्याग याची शिकवण साने गुरुजींना म्हणजे शामला त्यांच्या आई माता यशोदा यांनी दिली. माझे कुटुंब पैशाने गरीब होते. पण संस्कारांनी आणि मनाने खूप श्रीमंत होती त्याचा मला नेहमी अभिमान वाटे. संस्कार माझ्या आई -वडिलांनी दिले.
संन्यास म्हणजे काय याविषयी सानेगुरुजी म्हणतात, समाजात संन्यास म्हणजे निर्माण स्वतः स्वतःला पूर्णपणे कमी येणे. माझे कुटुंब, माझा समाज, माझी इच्छा, हे दुय्यम संन्यास म्हणजे समदृष्टी सूर्याचे किरण हे सर्वांसाठी समान तसेच संन्यास सुद्धा सर्वांसाठीच. माझ्याकडे कोणीही आला तरी मी त्यांचा आहे. समस्यांमध्ये आणखी या समाजाची सेवा करावी. अशी असती ना ही संन्यासी हा हिंदू नसतो आणि मुसलमानही नाही. नुसतं तुम्ही मी सेवा करीत राहतो सर्वांना समान प्रेम देतो. पशुपक्षी किडामुं-गी, वृक्ष-वनस्पती यांचाही मित्र होता आलं पाहिजे. या वेदांच्या चिखलातून मातीत होईल. म्हणून एके ठिकाणी राहू नये असे सांगितले जाते. वाऱ्याप्रमाणे जीवन देत राहील. अन सूर्याप्रमाणे पवित्र व मंगल प्रकाश किरण देत फिरत राहील आज समाजात वानप्रस्थ कोणीही ना काही कुटुंबात मर्यादित असतं सोडून समाज सेवा करू शकतो. माझ्या त्यांनी वाढत- वाढत सर्व त्यांना प्रेमाने मिठी मारायची.
पंढरपूरचे मंदिर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले व्हावे यासाठी 1947 आली त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले गांधींच्या हत्येनंतर 1948 फेब्रुवारी महिन्यात 21 दिवसांचे उपोषणही त्यांनी प्रायश्चित म्हणून केले. जाती-धर्माच्या लोकांनी सर्वांना सामान्यत समान वागणूक द्यावी ही त्या पाठीमागची प्रेरणा होती. ते म्हणत कायदा करून हरिजनांसाठी विठ्ठल मंदिर खुले करू नका. प्रत्येकाच्या हृदयापासून विठ्ठल मंदिर खुले करण्यास सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपले मन मोठे करावे. यासाठी साने गुरुजींनी शेवटपर्यंत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी उघडल्याची बातमी आली. तेव्हा महात्मा गांधी दिल्लीच्या प्रार्थनासभेत होते. महात्मा गांधीजी म्हणाले. आज आणखी एक आनंदाची बातमी कानी आली. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे प्रसिद्ध मंदिर हिंदू प्रमाणे हरिजनांसाठी सुद्धा खुली करण्यात आलेले आहे. त्याचे विशेष श्रेय साने गुरुजी यांना जाते. हरिजनांसाठी हे मंदिर उघडे आहे म्हणून त्यांनी आमरण उपवास उपोषण सुरू केला होता. हरिजनांना मंदिर खुले केल्याची कोर्टात जाहीर केल्यानंतर दादासाहेब मालवणकर यांच्या विनंतीनुसार साने गुरुजींनी 10 मे 1947 रोजी उपोषणाची समाप्त केली. मंत्री गणपतराव तपासे यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात सर्वांनी प्रवेश केला.
साने गुरुजी यांनी 15 ऑगस्ट 1948 मध्ये साधना साप्ताहिक सुरू केले. साने गुरुजींनी आपल्या पहिला अंकामध्ये मनोगत व्यक्त केले हे स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला समान संधी, स्वातंत्र्य म्हणजे शुभ संपन्न करण्याचे साधन, कोणीही दुःखीकष्टी नको, स्वाभिमानाने प्रत्येकाला जगता आले पाहिजे, विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र आणि सर्वांच्या दारी गेला पाहिजे, विशाल दृष्टी, व्यापक सहानुभूती यांच्या आवश्यकता आहे. तर संस्कृती, फुले, मानवता पुणे या चैतन्यमयी शब्दांमध्ये त्यांच्या मनातील स्वतंत्र भारताचे स्वप्न रेखाटली आणि हे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा देण्यासाठी साधना सुरू केली. द
1948 झाली त्यांनी साप्ताहिक साधना सुरू केले. साधनाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सत्याग्रही जीवननिष्ठा या छत्र सुतळीची शत्रु सूत्रे चा वापर करून समाजाचे प्रबोधन केले, साने गुरुजी ना.ग. गोरे, एस.एम.जोशी, वसंत बापट, यदुनाथ थत्ते प्रा.ग.प्र.प्रधान यांच्यासारखे त्यागी निरपेक्ष वृत्तीने देशसेवेसाठी आजीवन समर्पित असे शिष्य साने गुरुजींनी तयार केले. व पुढे ते साधनाचे संपादक म्हणून काम पहिले. समाजवादी विचारधारा जपण्यासाठी सानेगुरुजी मूल्य तत्व जपण्यासाठी यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. स्वतःचा संसार सोडून देशाचा संसार करण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. गोड गोष्टी, सुंदर पत्रे,पत्री काव्यसंग्रह, भारतीय संस्कृती अशा 100 हून अधिक पुस्तके साने गुरुजींनी लिहिली. खरा तो एकची धर्म, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ही स्फूर्ती गीत साने गुरुजी यांनी लिहिलेली.
वंचित, उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी रयत संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. दुर्गम, ग्रामीण आदिवासी भागांमध्ये शाळा सुरू करून वंचित, उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीरांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गुरुजींना अपार कौतुक होते. ऑक्टोंबर 1948 मध्ये कराडमध्ये प्रांतिक काँग्रेसचे अधिवेशन आचार्य शंकरराव जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले होते. या अधिवेशनामध्ये साने गुरुजींनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्याचा गौरव करून त्यांचा महात्मा गांधी यांच्या हस्ते मोठा सत्कार करावा व त्यांना एक लाखाची थैली देण्यात यावी. असा ठराव मांडला त्या ठरावासाठी एस.एम.जोशी यांनी अनुमोदन दिले. ठराव मंजूर झाला. पैसे गोळा करण्यास सुरुवात झाली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. आणि पुढे संत गाडगे महाराज यांच्या हस्ते सर्व मित्रांना 1,11,111 रुपयाची मदत केली. सातारा येथील धणीनीच्या बागेतील एका समारंभात देण्यात आली. कर्मवीरांचे छोटीशी पहिले चरित्र साने गुरुजींनी लिहिले असून ते प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे.
आज भारत देशामध्ये 29 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येकाची संस्कृती यामध्ये भाषा, आहार, वेश त्यामध्ये बदल दिसून येतो पण प्रत्येक राज्याची प्रादेशिक भाषा आपल्याला अज्ञात नसते. या भाषा शिकायची असतील त्यातून एक वैश्विक विचार निर्माण होईल. आणि त्यातूनच साने गुरुजींनी त्यांनी अनेक भाषा शिकून घेतल्या. त्यातूनच आज साने गुरुजी यांची ‘आंतरभारती’ ची संकल्पना विकसित झाली. प्रादेशिकतावाद वाढू नये यासाठी आंतरभारतीची संकल्पना भारताला एकसंघ राहण्यासाठी खूप उपयोगी ठरते. भारतातील विविध राज्यातील विविध प्रदेशातील विविध प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकता याव्यात, संस्कृती समजून घेता यावी उत्सव, भाषा माहिती करून घ्यावी. यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून घेण्याचे ठरले. त्यासाठी विविध राज्याच्या प्रांतीय भाषा शिकणाऱ्या या वेळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतरांची मदत घ्यावी, शैक्षणिक संस्थांची मदत घ्यावी, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. हे साने गुरुजींनी व्यक्त केले होते त्यासाठी त्यांनी काही निधी सुद्धा गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
समाजाचा, राष्ट्राचा संसार करण्यात गुरुजींनी धन्यता मानली. नाही तर त्या काळामध्ये तत्त्वज्ञान संस्कृत मध्ये उच्चविद्याविभूषित गुरुजी गलेलठ्ठ पगार मिळवून स्वतःचे जीवन व्यतीत केले असते. पणत्यांना भारतमातेच्या सेवेसाठी आजीवन वाहून घेतले. लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आंतरभारतीची संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी आजीवन कार्यरत राहिले आजीवन सज्जनतेची साधना करणारा हा थोर महापुरुष म्हणजे परमपूज्य साने गुरुजी आज त्यांच्या ७२ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
रयत शिक्षण संस्थेचे,
महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सातारा
प्रा.प्रदीप बबन हिवरकर
७७७ ४८९ ६६३२