नटराज नृत्य कलाशाळा आणि नृत्य साधना संस्थेच्या भरतनाट्यमने संगीत व नृत्य महोत्सवाची सांगता


सातारा – नटराज नृत्यकला शाळेच्या कलाकारांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ यांचे वरील नृत्य नाटिका सादर केली. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 16 फेब्रुवारी, सातारा : येथील नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात गुरु सौ. आचल घोरपडे यांच्या नटराज नृत्यकला शाळा आणि सुधांश किरकिरे यांच्या नृत्यसाधना संस्थेच्या कलाकारांनी बहारदार अशी भरत नाट्यम नृत्य सादर करून या महोत्सवाची सांगता केली.

नटराज मंदिरात नटराज नृत्यकला शाळेच्या प्रारंभी झालेल्या नृत्य कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत आणि महाशिवरात्री बद्दल माहिती देत केली .त्यानंतर या संस्थेविषयी स्मिता यांनी माहिती दिल्यावर गुरु आचल घोरपडे यांचे विषयी उपस्थित त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मैसूर जती ,आलारिपू, गमन नाग नागम, नटेश कौतुकम, शिवपंचाक्षरस्तोत्र सादर होऊन त्यानंतर ..तिलाना.. नृत्य सादर झाले .त्यानंतर श्रीहरी स्तोत्र सादर होऊन ..भैरवी षटक.. आणि ..नटराजन.. ही कानडी भाषेतील रचनेवर नृत्य सादर होऊन ..कलिंगा नर्तन.. नटन विशारद.. आणि श्री स्वामी समर्थांवर अतिशय सुरेख अशी नृत्य नाटिका सादर करण्यात आली. मंगलमने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली.

यानंतर सादर झालेल्या नृत्य कार्यक्रमात नृत्यसाधना संस्थेच्या वतीने..शंभो.. या नावाने पस्तीस कलाकारांनी 13 बहारदार अशी भरतनाट्यम नृत्य सादर केली. यामध्ये गणेश वंदना.. शिव मानस पूजा.. शिवपंचाक्षर स्तोत्र ..मंजुनाथ नटेश्वरा.. सादर झाले. आशुतोष शशांक शेखर ..सादर होऊन .. भो शंभो शिवशंभो स्वयंभो .. या रचनेवर भरतनाट्यम सादर झाली झाले …हरहर शंभो शंभो.. सादर होऊन शिव आरती वर झालेल्या नृत्यने रंगलेल्या बहारदार अशा नृत्य कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमानंतर गुरु सुधांश किरकिरे तसेच गुरु सौ .आचल घोरपडे व सहभागी कलाकारांचा नटराज मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रमाणपत्र सन्मान योजना व प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी, वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Back to top button
Don`t copy text!