दैनिक स्थैर्य | दि. १४ मार्च २०२४ | फलटण |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी व फलटण तालुक्यातील सर्वांचे आवडते भाऊ सुभाषराव शिंदे यांचे पुणे येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. कै. सुभाषभाऊंना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. १५ मार्च रोजी फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे यांनी सांगितले आहे.
सुभाष शिंदे (भाऊ) हे रिक्षा संघटनेच्या चालक-मालक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते. रिक्षा संघटनेला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असायचे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ते न चुकता हजेरी लावून रिक्षा संघटनेच्या चालक-मालक यांना मार्गदर्शन करत. अशा या खंबीर नेतृत्वाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.