दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गात प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणेकरीता सातारा नगरपालिका हद्दिपासून 5 किमी अंतराच्या आतील महाविद्यालयामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003