दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी येथील उद्योजक,सुयश ऑटो कामगार पतसंस्थेचे चेअरमन भारत नाना जाधव यांची राष्ट्रवादी उद्योग व्यापार व व्यवसाय विभागाच्या बारामती शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मंगळवार दि. 08 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व्यापार सेलचे प्रदेश कार्यकारी सदस्य पी टी काळे, बारामती शहर अध्यक्ष वैभव शिंदे, बारामती चेंबर चे अध्यक्ष प्रमोद काकडे, के मार्ट चे संचालक खटावकर, मार्केट कमिटी चे सचिव अरविंद जगताप आदी च्या हस्ते भारत जाधव यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना गृह उद्योग, तरुणांना लघूउद्योग, फूड मॉल मधून शेती मॉल, प्रकीर्या उद्योग, विक्रीचे व्यवस्थापन, सर्व प्रकारच्या मालासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानीत योजना व सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून उद्योग उभारणाऱ्या तरुणांसाठी एमआयडीसी मध्ये प्लॉट उपलब्ध करून देणे व उद्योग साठी शासनाचे सहकार्य, व्याखाने, मार्गदर्शन शिबिरे भरवणार असल्याचे भारत जाधव यांनी निवडीनंतर सांगितले. वैभव शिंदे यांनी उप्स्तीतचे स्वागत करून आभार मानले.