भरत बेडके अजितदादांच्या राष्ट्रवादीत; आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजेंच्या उपस्थितीत केला प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. १६ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भरत बेडके यांनी आमदार सचिन पाटील व सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत युवा उद्योजक अजिंक्य बेडके यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले की; येत्या काळामध्ये फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत. येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले असल्याने राज्यावरून सुद्धा आपल्या कसलीही अडचण येत नाही व येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येणार नाही.


Back to top button
Don`t copy text!