बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या वतीने भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांच्या धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समितीच्या वतीने “धम्म विजय” या विषयावर “धम्म विजय संकल्प देसना” व “पर्यटन समितीच्या वतीने धम्मस्थळांना भेट दिलेल्या पर्यटकांना प्रमाणपत्र वितरण” या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मा. सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली, महानाग साक्यमुनि विज्जासन या भारतातील पहिल्या बुद्धिस्ट सेमिनरीचे संस्थापक भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांची धम्मदेसना दि. २० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जेरबाई वाडिया मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे सभापती मा. आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त किशोरजी मोरे, सरचिटणीस राजेशजी घाडगे, खजिनदार नागसेन गमरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, त्याचसोबत उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, अंकूश सकपाळ, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे तसेच समितीचे अतिरिक्त चिटणीस, चिटणीस, सर्व शाखांचे अध्यक्ष, पदाधिकारी, व्यवस्थापक मंडळ सदस्य, मध्यवर्ती महिला मंडळ उपस्थित राहणार आहेत. तरी धम्मसहलीच्या पर्यटकांनी, उपसमित्या, त्यांचे कार्यकर्ते, उपासक, उपसिकांनी, प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेशजी पवार व चिटणीस मनोहरजी मोरे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.


Back to top button
Don`t copy text!