बँक केवायसी मेसेजपासून सावध राहा

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । फलटण । मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे आधार केवायसी प्रलंबित असल्याने बँक आधार केवायसी अ‍ॅप उघडा आणि तुमचे आधार केवायसी कार्ड अपउंट करा, अशा प्रकारचे येणारे मेसेर फसवे आहेत. अ‍ॅप उघडल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ शको. बँकेकडून अधिकृतपणे असे कोणतेही मेसेज पाठवले जात नाहीत. ग्राहकांनी या मेसेजपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा म्हणाले, अनेकांच्या मोबाईलवर प्रिय ग्राहक तुमचे आधार केवायसी प्रलंबित असल्याने तुमचे एसबीआय बँक खाते आज ब्लॉक केले जाईल. कृपया तुमचा आधार कार्ड नंबर त्वरित अपडेट करा. बँक आधार केवायसी अ‍ॅप उघडा आणि तुमचे आधार केवायसी कार्ड अपडेट करा. अशा प्रकारचे संदेश येत आहेत. सोबत इमेज येते ती इमेज कोणीही ओपन करू नये. अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते. बँके मार्फत अशाप्रकारे कोणतेही आवाहन करण्यात आले नाही. काही समाजकंटक फसवणूक करण्यासाठी असे संदेश पाठवीत आहेत. अशा संदेशाला कोणी बळी पडू नये.

आपणाला आवश्यक असेल तर आधार अपडेट करण्यासाठी ग्राहकांनी बँकेत जाऊनच अपडेट करावी, असे आवाहन पोनि हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!