दि.१० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२३ दरम्यान कोल्हापूर येथे अग्निवीर सैन्य भरती


दैनिक स्थैर्य । दि. १७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी  ते 11 मार्च 2023 दरम्यान  ऑनलाईन  सीईई  अग्निवीर सैन्य भरतीचे  आयोजन करण्यात आले आहे. ही भरती कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहे.

सदर  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रथम  www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर आपले  ऑनलाईन अर्ज भरुन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य  आहे. यशस्वरीत्या रजिस्ट्रेशन  केलेल्या उमेदवारांची ॲडमिट कार्ड त्यांच्या ई मेल आयडी वर उपलब्ध होतील याची नोंद घ्यावी.

दि. 12 एप्रिल 2023 पासून पुढे ऑन लाईन सीईई  परीक्षा सुरु होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सातारा येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील युवकांनी  या  सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त फायदा  घ्यावा. असे  जिल्हा सैनिक कल्याण  कार्यालयाकडून  कळविण्यात  आले आहे.


Back to top button
Don`t copy text!