स्थैर्य, मुंबई, दि. २५: महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे दिव्य जीवन कार्य तसेच त्यांच्या सत्य, अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताच्या शिकवणीचे स्मरण देतो. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण जगात प्रेम व सद्भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करूया. सर्व नागरिक बंधु-भगिनींना मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.