ज्येष्ठाची मोफत दाढी कटिंग करून वाढीवसाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२३ । बारामती । बारामती शहरातील तांदळवाडी या ठिकाणी असलेल्या बोरावके वृद्धाश्रमामध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आकाश पगारे या कारागीर युवकांनी’ केसांची स्वछता व डोक्यातील केसांना आजार होऊ नये ‘ या विषयी मोफत मार्गदर्शन केले.या प्रसंगी बोरावके वृद्धाश्रमाचे सचिव किशोर मेहता, उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके,फकरूशेठ बोहरी, अमित बोरावके ,अभय शहा ,डॉ अजिंक्य राजे निंबाळकर डॉ, अजित आंबर्डेकर डॉ सई सातव व उद्योजक सुरेंद्र भोईटे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक किरण शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.सुर्यनगरी  मध्ये बी. ए सलून  अँड टॅटूज च्या माध्यमातून व्यवसाय करताना विविध आजारामुळे सलून मध्ये ज्येष्ठ नागरिक येऊ शकत नाही म्हणून त्यांच्याच घरी जाऊन व्यवसाय करताना सदर कल्पना सुचली व उपक्रम सुरू केला सदर उपक्रम मोफत दोन दिवस चालतो सामाजिक बांधिलकी जोपासत सदर उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवित असतो या माध्यमातून ज्येष्ठाची सेवा करण्याचे भाग्य लाभते व बुके, हार, तुरे ,फ्लेक्स, आदींवर खर्च न करता मोफत दाढी कटिंग चा उपक्रम राबवित असल्याचे आकाश पगारे यांनी सांगितले.उत्तम व आदर्शवत उपक्रम असून ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे वृद्धाश्रमाचे सचिव किशोर मेहता यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!