स्थैर्य, मुंबई, दि.०७: जुलै आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये चालू असलेल्या अर्जाच्या प्रक्रियेत ऑस्ट्रेलियातील चार्ल्स स्टर्ट युनिव्हर्सिटी स्टडी सेंटरने आपल्या बर्सरी आणि स्कॉलरशिप पेमेंटद्वारे भारतातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सवलत जाहीर केली आहे. यामुळे महामारीनंतर २०२१ मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील शुल्कात मोठी कपात मिळणार आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्याासाचा कालावधी वाढवला जाईल.
पात्र विद्यार्थ्यांना, त्यांच्या ऑफर लेटरवर आधारीत, बर्सरी किंवा स्कॉलरशिपचा लाभ मिळू शकतो. लेटरच्या दुसऱ्या पानावर, वर्षातील नोंदणी केलेल्या विषयांच्या शिक्षण शुल्क नमूद केले जाईल, ज्यात सवलतीचाही हिशोब असेल. भारतीय विद्यार्थ्यांना १५ टक्क्यांपर्यंत पोस्टग्रॅज्युएट इंटरनॅशनल स्टुडंट एक्सलन्स स्कॉलरशिप घेता येऊ शकेल. ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि मास्टर्स प्रोग्रामच्या कालावधीत हा लाभ मिळेल. भारतीय अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सच्या कालावधीत शुल्कात १२ टक्के कपात मिळवण्यासाठी कोव्हिड-१९ रिलिफ बर्सरीसाठी अर्ज करता येईल.
स्टडी ग्रुप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मॅनेजिंग डायरेक्टर, अॅलेक्स शेवरोल म्हणाले, “यावर्षी महामारीचा प्रभाव सुरु असतानाही, विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच त्यांच्या पसंतीच्या संधींचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. आमचे भागीदार, चार्ल्स स्टर्ट युनिव्हर्सिटीने आतापर्यंत अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएटचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना या पातळीपासून एक यशस्वी करिअर घडवेपर्यंत त्यांना पाठींबा दिल्याचा इतिहास आहे. आमच्या बर्सरी आणि स्कॉलरशिपद्वारे जास्तीत जास्त प्रतिभावंत भारतीय विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेता येईल. सध्याच्या संकटकाळात विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे उद्दिष्ट लांबणीवर पडू नये, यासाठी आमचा स्टडी ग्रुप विद्यार्थ्यांप्रती समर्पित असून तो सतत त्यांना मदत करेल.”