दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२४ | फलटण |
ओम परमपूज्य परमहंस श्री सद्गुरू यशवंतबाबा गोपालन संस्था झिरपवाडी (ता. फलटण) येथे बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला.
ही गोशाळा गेली दहा ते बारा वर्षांपासून मुक्या जीवांसाठी देशी गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करत असून आजपर्यंत अनेक जीव या ठिकाणी सांभाळले गेले आहेत.
गोशाळेमध्ये सध्या अपंग, भाकड व अनेक प्रकारचे जीव असून यांची सेवा मनोभावे, तन-मन-धनाने केली जाते व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हे कार्य सुरू आहे.
बेंदूर सणानिमित्त फलटण, बारामती व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग यांनी गोशाळेला भेट देऊन बैलांचे व गोमातेचे पूजन केले व त्यांना गोग्रास दिला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. सदाशिव कुंभार यांनी येणार्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व गोसेवेला जोडून घेण्यास सर्वांना निवेदन केले.