विद्या प्रतिष्ठान मध्ये मधमाशी पालन व जैविक खत निर्मिती कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२३ । बारामती । विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे मधमाशी पालन व जैविक खत निर्मिती आणि वापर याविषयी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन.  दि. 25 मे ते 26 मे 2023 रोजी विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती आणि गोदावरी फार्म श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी  मधमाशी पालन आणि जैविक खत निर्मिती व वापर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी  संस्थेचे उपाध्यक्ष ऍड अशोक प्रभुणे, संस्थापक संचालक गोदागिरी फार्म श्रीरामपूर चे ऋषिकेश औताडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ हे उपस्थित होत्या.  मधमाशीपालन आणि जैविक खत म्हतपूर्ण  असून  80 टक्के आयुर्वेदिक औषधे मधाबरोबर घेतली जातात त्यामुळे आयुर्वेदात मधाचे महत्त्व जास्त आहे.  आजच्या घडीस मधमाशी पालन या क्षेत्रात जास्त स्पर्धा नाही त्यामुळे आपल्या तरुण पिढीसाठी यामध्ये खूप संधी आहेत.  मधमाशी जर पृथ्वीवरून नष्ट झाली तर मानव जात फक्त चार वर्षेच  जगेल असे ऍड अशोक प्रभुणे यांनी सांगितले.
मधुबन हा शब्द पुरातन काळापासून आहे  मधमाशीच्या बी वॅक्स पासून मेन तयार केले जाते   मधमाशी हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मताची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पन्न घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापन, कीटक मधमाशीचे सृष्टीतील स्थान, कृत्रिम पेठेचे प्रकार, मधमाशांचे वैशिष्ट्य मधमाश्याची श्रमविभागणी, वसाहतीचा जीवनक्रम आणि वसाहतीची वाढ व मधमाश्या पालनाच्या विविध शासकीय योजना याबाबत ऋषिकेश औताडे यांनी माहिती दिली.
 शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना बी कीपिंग च्या फ्रेम स्लाईटचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन , जैविक खत निर्मिती कशी केली जाते तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व  या विषयी मार्गदर्शन विविध मान्यवरांनी केले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ऍड अशोक प्रभुणे, खजिनदार  युगेंद्र पवार, सचिव   निलीमा गुजर, विश्वस्त  डॉ. राजीव शहा,  मंदार सिकची, किरण गुजर, रजिस्ट्रार कर्नल श्रीष कंबोज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत शेरखाने यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.शैलजा हरगुडे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रा. जिज्ञासा ओक यांनी मानले.

Back to top button
Don`t copy text!