संस्कृती नृत्यालयाच्या कलाकारांचे सुरेख सादरीकरण


सातारा – भरतनाट्यम सादर करताना संस्कृती नृत्य विद्यालय कलाकार. (छाया – अतुल देशपांडे)

स्थैर्य, 15 फेब्रुवारी, सातारा : श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शनिवारी सायंकाळी संपन्न झालेल्या भरतनाट्यम नृत्य सोहळ्यास शेकडो सातारकरांनी उपस्थिती लावली.संस्कृती नृत्य विद्यालय, पुणेच्या संचालिका सौ.पल्लवी सारंग कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नृत्य कार्यक्रमात 17 शिष्यांनी सहभाग घेऊन आपल्या भरतनाट्य नृत्य शैलीतील रचनांवर सुरेख अभिनय व पदलालित्य याचे सुरेख दर्शन घडविलेसादर करून आपल्या नृत्य साधनेची ओळख प्रेक्षकांना करून दिली.

या कार्यक्रमाचा प्रारंभ विघ्नहर्ता गणरायाला गणेश वंदनाने करून ..शंभू.. या नटराज्याचे वर्णन असलेल्या रचनेवर समूह नृत्य सादर झाले . त्यानंतर आणखी एक.. नटेश कौतुकम.. सादर होऊन ..अर्धनारी नटेश्वराचे रूप नृत्यातून सादर झाले. मानसी चे वैयक्तिक नृत्य सादर होऊन.. चंद्रचूड शिवशंकर.. सादर झाले आणि ..वर्णम .. हा शुद्ध नर्तन प्रकार असलेले नृत्य सादर होऊन ..नटरंग आडीनार .. सादर होत, दिशा नी विठ्ठल भक्तीचा सुरेख संगम नृत्यातून दर्शविला. दृष्टी चे आणखी एक वैयक्तिक नृत्य सादर होत.. तिल्लाना..ने या रंगलेल्या नृत्य सोहळ्याची सांगता झाली. या नृत्य कार्यक्रमात कीर्ती माक्कम मानसी वाकडकर, रचना, प्रेरणा, दिशा नरे,श्रेया वैद्य ,ईशा भालेराव, कोहिरी पटवर्धन,अलिषा अहिरे,अबोली सुतार,श्रेया बर्गे ,रमा,ऐश्वर्या शिंदे ,दृष्टी सापा ,दिया अग्रवाल, नित्या मारकर आणि कृतिका साठे यांनी सहभाग घेतला होता. या सर्व नृत्य कलाकारांचा सत्कार मंदिराच्या वतीने सुहास शहाणे,सौ.कांचन शहाणे,सौ.शैलजा व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले होते . कार्यक्रम प्रसंगी वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी, वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!