स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : आजारी नातेवाईकावर उपचार करण्यास नकार दिल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना खातवळ येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी: खातवळ (ता.येथील ) येथील डॉ.किरण फडतरे यांच्या निवास स्थानी रात्री साडे आकाराच्या सुमारास एनकुळ येथील उमेश शामराव जगताप आपल्या नातेवाईक रुग्णास घेऊन आले व घराचा दरवाजा मोठं मोठ्याने वाजवू लागले. व आताच्या आता आमच्या रुग्णावर उपचार करा असे म्हणू लागले. परंतु उपचार करण्यासाठी आता घरामध्ये कोणतेही साधन उपलब्ध नाही.असे डॉ.फडतरे यांनी सांगितल्याने चिडलेल्या जगताप यांनी हाताने मारहाण केली असल्याची फिर्याद डॉ.फडतरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास बीट अंमलदार भोसले करत आहेत.