दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । सातारा । पेट्रोल चोरण्याच्या गैरसमजातून नरेवाडी येथे एकास मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद जगदीश रामचंद्र चव्हाण वय : ३८ वर्ष रा. नरेवाडी पो. भाटमरळी ता.सातारा यांनी दिली आहे. याप्रकरणी विकास हरिभाऊ चव्हाण, यशवंत नाना चव्हाण, कांता यशवंत चव्हाण आणि हरिभाऊ पांडुरंग चव्हाण अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १४ जून रोजी रात्री ९.३० चे सुमारास नरेवाडी येथील जगदीश चव्हाण हे राहत्या घराच्या मागील पारड्यात गेले असता त्यावेळी तिथे असलेल्या विकास चव्हाण याने माझ्या गाडीतील पेट्रोल चोरत असलेचा गैरसमज करून त्यांचे हातातील लोखंडी रोडने जगदीश चव्हाण यांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जगदीश चव्हाण यांचे पत्नीने त्यास वाचविण्यास धाव घेतली असता कांता चव्हाण यांनी तिलाही लाथा बुक्क्याने मारहाण केली. दोघा पती-पत्नी यांना शिवीगाळ व दमदाटी करून पळ काढला. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अधिक तपास चालू आहे.