वाढे येथे हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला जखमी करत खिशातील अठरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच ही भांडणे सोडवायला गेलेल्या एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी करण्याची घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली असून गणेश सागर पवार, राज रतनदीप जाधव, अनिकेत रतनदीप जाधव, सोहन मोहन माळी अशी त्यांची नावे आहेत. दोघे फरा असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबतची तक्रार गुरुवार, दि. २३ रोजी दुपारी दीड वाजता दाखल झाली आहे.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, दत्तात्रय बबन नलवडे (वय ३0, रा. वाडेकर स्वीट मार्ट, वाढे, ता. सातारा) हे व्यवसायिक असून त्यांचे वाडेकर स्वीट मार्ट आहे. या स्वीटमार्ट समोर भांडणे सुरु होती. ती सोडविण्यासाठी दत्तात्रय बबन नलवडे आले असता गणेश सागर पवार (रा. कोडोली, सातारा), राज रतनदीप जाधव (रा. समर्थ मंदीर, सातारा), अनिकेत रतनदीप जाधव (रा. समर्थ मंदीर, सातारा), सोहन मोहन माळी (पाटखळ, ता. सातारा) व अन्य दोघे असे सहा संशयित त्यांच्या स्नॅक सेंटरमध्ये घुसले आणि टेबलवर ठेवलेले सर्व साहित्य खाली पाडले. खुर्च्या आणि काचेच्या टेबलच्या कपाटाची काच आणि टेबलवरील कडप्पाची फरशीही तोडून टाकली तर दत्तात्रय नलवडे यांना हात, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातला. यात ते जखमी झाले.

दरम्यान, हे सहाजण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यापैकी एकाने दत्तात्रय नलवडे यांच्या जर्किनच्या खिशातील अठरा हजार रुपये काढून घेतले. ‘तुला जीवंत सोडणार नाही. तुझे हॉटेल जाळून टाकीन,’ अशी धमकीही दिली. दरम्यान, ही मारहाण सुरु असताना निसर्ग हॉटेलचे मॅनेजर संभाजी पवार हे दत्तात्रय नलवडे यांना सोडविण्यासाठी पुढे आले असता त्या सहाजणांनी त्यांच्याही डोक्यात फरशीचा तुकडा घालून मारहाण केली.

याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सहा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक अमित पाटील यांच्याकडे होता. त्यांनी अशितय कसोशीने प्रयत्न करत तसेच प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीच्या आधारे संशयित गणेश सागर पवार, राज रतनदीप जाधव, अनिकेत रतनदीप जाधव, सोहन मोहन माळी या चारजणांना अटक केली. अन्य दोघे फरार असून सातारा तालुका पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!