
स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बापुसाहेब शंकरराव देशमुख (पाटील) यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी पार्टी अंतर्गत समझोत्यानुसार राजीनामा दिल्याने श्री. देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी उपाध्यक्ष बबनराव देशमुख, संचालक हणमंतराव देशमुख, किसनराव जगदाळे, राजेंद्र देशमुख, नारायण माने, शिवाजी शिंदे, अर्जुन जाधव, जालिंदर हिरवे, उर्मिला देशमुख, पद्मावती यादव, श्री. कांबळे आदी संचालक उपस्थित होते. सचिव वैभव देशमुख (पाटील) यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.
माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीपराव येळगांवकर, यशवंतबाबा देवस्थानचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, डॉ. विवेक देशमुख, प्रा. एस. पी. देशमुख, प्रतापराव देशमुख आदिंसह मान्यवरांनी अध्यक्ष पाटील यांचे अभिनंदन केले.