बापुराव सहस्त्रबुद्धे यांचे निधन


दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे संस्थापक सदस्य व शारदा किराणाचे मालक चिंतामणी नारायण सहस्त्रबुद्धे उर्फ बापूराव यांचे वृद्धापकाळाने (वय 93 वर्षे) निधन झाले.

शंकर मार्केट म्हणजे फलटण करांचे दररोज सकाळी मंडई खरेदीचे ठिकाण,व तेथे शारदा किराणा मध्ये किराणा खरेदीचे आवडते ठिकाण,तब्बल दोन पिढ्या सुरू असलेले विश्वासू किराणा दुकान, या मुळे सर्व फलटणकरांच्या या बापूराव यांचे निधनाची बातमी येताच सर्व लोकांना अतीव दुःख झाले, त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!