
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । बीड । खडकीघाट येथील श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था संचालित बंकट्स्वामी विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-2023 निमित्त दि.15/6/2022 बुधवार रोजी सकाळी ठीक 10 वा. प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी सुरुवातीला ज्यांच्या नावाने ही शिक्षण संस्था आहे असे वैकुंठवासी ह .भ. प.बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री संजय सावंत सर (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गावातील काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यांचाही सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला नंतर वर्ग 5 वी आणि वर्ग 8 वी मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देताना शिक्षण विषयक विचार मांडताना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार विद्यार्थ्यांना संगितले.
“विद्या विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले”
कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांनो तुमचे शैक्षणिक नुकसान खूप झाले आहे त्यामुळे आता शाळा सुरू झाल्यापासून कधीच गैरहजर राहू नका ज्यादा तासाला ही उपस्थित रहा रोजच्या रोज शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करा त्याच बरोबर व्यायामही करा तरच तुमची प्रकृती ताजीतवानी राहून अभ्यास करण्यास पोषक वातावरण तयार होईल म्हणून खूप अभ्यास करा आई वडिलांचे नाव करा शाळेचे नाव करा आणि काहीतरी वरिष्ठ पदाला गवसणी घाला. तरच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होताल. एवढेच नाही तर शाळेची शिस्त पाळा शालेय गणवेश यातच शाळेत या वर्गामध्ये जातीभेद करू नका विश्वचि माझे घर या उक्तीप्रमाणे एकमेकाला सहकार्य करून तुमचे आयुष्य उज्वल करा हे सांगितले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक वृंद श्री उंदरे सर श्री सुपेकर सर श्री खाकरे सर श्री रिंगणे सर श्री आनेराव सर श्री मोरे सर श्री अविनाश खाकरे सर श्री मांजरे सर श्री कुरे सर सुरेश बापू भोसले संजय बनसोडे बाबुराव कानडे कल्याण अनंत्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन श्री भोसले सुरेश बापू सर यांनी केले याप्रसंगी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व जुन्या विद्यार्थ्यांना पुस्तकेही वाटप करण्यात आली व शालेय कामकाजाला सुरुवात झाली.