ट्रक – दुचाकी धडकेत बँक अधिकार्‍याचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. 22 जुन 2025 । सातारा । सातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला.

सातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला. तुषार सतीश कांबळे (वय 43, रा. कामाठीपुरा, सातारा) असे ठार झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.

याप्रकरणी विश्वजीत विश्वास जाधव (रा. गोडोली, सातारा) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक नीलेश दिलीप तवटे (रा. मालगाव ता. मिरज जि, सांगली) याच्याविरोधात गुन्हा रहिमतपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तुषार कांबळे हे सातार्‍याहून दुचाकीने रहिमतपूरकडे निघाले होते. सायगाव गावच्या हद्दीत ते आले असता समोरून येणार्‍या ट्रकने त्यांना धडक दिली. अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कांबळे यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.


Back to top button
Don`t copy text!