आपल्या घरातून आळस, भांडण व व्यसन हद्दपार केल्यास कुटुंबाची प्रगती होते – अभिनेते भरत शिंदे


दैनिक स्थैर्य | दि. २४ मे २०२३ | फलटण |
लहाणपणी मुलांच्या अवास्तव लाडामुळे युवकांमध्ये गुन्हेगारी वाढत असून घरातून आळस, भांडण व व्यसन हद्दपार केल्यास कुटुंबाची निश्चितच प्रगती साध्य होत असल्याचे ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम अभिनेते भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांनी स्पष्ट केले.

दुधेबावी, ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत अभिनेते भरत शिंदे उर्फ बाळासाहेब बोलत होते. यावेळी क्राईम ब्रँच ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, फलटणचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, चांडाळ चौकडीच्या करामती फेम रामभाऊ जगताप, सुभाषराव मदने, फलटण तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, सरपंच सौ. भावनाताई सोनवलकर, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भरत शिंदे म्हणाले की, मोबाईल व व्यसनाच्या आहारी युवक जात असून संगतीचा परिणामही होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. संगणक व मोबाईलच्या युगात ग्रामीण भागामध्ये व्याख्यानमाला सुरू करणे कठीण आहेच, पण व्याख्यानमालेची चळवळ गावागावात पोहचून प्रबोधन वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

व्यक्तिमत्त्व उत्तम घडवायचे असेल तर निश्चितपणे लोकप्रबोधन गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्च ध्येय प्राप्त केलेल्या व्यक्ती गावात आणून लोकप्रबोधन करण्याची दुधेबावी प्रतिष्ठानची परंपरा अभिमानास्पद असून तरुणांध्ये ध्येय असणे गरजेचे असल्याचे भरत शिंदे यांनी निदर्शनास आणले.

महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात सातत्यपूर्ण चालणारी ही एकमेव व्याख्यानमाला असून, दुधेबावीतील अधिकारी वाढण्यामध्ये दुधेबावी प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रम निश्चितच अभिमानास्पद असल्याचे भरत शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बलवंत पाटील, रावसाहेब मोरे, प्रा.रमेश आढाव, हणमंतराव सोनवलकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सागर कराडे यांनी केले. प्रास्ताविक विजयकुमार नाळे यांनी केले. आभार सागर मोरे यांनी मानले.

यावेळी शिक्षक बँकेचे संचालक संजीवन जगदाळे, राजेंद्र बोराटे, विजय बनसोडे, नितीन काळे, शहाजी खाडे, सौ. पुष्पलता बोबडे, सौ. निशा मुळीक, सोसायटीचे चेअरमन श्रीमंत नाळे, सोनवलकर, अविनाश चांगण, डॉ. युवराज एकळ, संतोष भांड, विठ्ठल सोनवलकर, दादासाहेब पवार, सौ. स्वाती नाळे, राजेंद्र मुळीक, संजय बोबडे, सुभाषराव नाळे, सचिन दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!